You are currently viewing अटल करंडक एकांकिका स्पर्धेत ‘ढ’ मंडळी, कुडाळची ‘बिलिमारो’ एकांकिका प्रथम.

अटल करंडक एकांकिका स्पर्धेत ‘ढ’ मंडळी, कुडाळची ‘बिलिमारो’ एकांकिका प्रथम.

‘ढ’ मंडळींच्या बिलिमारो एकांकिका संपूर्ण महाराष्ट्रात आवळला अवल्ल..

कुडाळ /-

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा २०२२ ची अंतिम फेरी पनवेल येथे पार पडली, गेल्या महिन्याभरात संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व विभागतून शंभरहुन अधिक एकांकिका संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. यामधील निवडक एकांकिकेंच्या अंतिम फेरीत ‘ढ’ मंडळी, कुडाळ यांच्या बिलिमारो या एकांकिकेने प्रथम पारितोषिक मिळवत अटल करंडक सारख्या मोठ्या स्पर्धेचा मान पटकावित इतिहास रचला आहे. एकांकिका प्रथम क्रमांक- बिलिमारो दिग्दर्शन प्रथम क्रमांक- तेजस मस्कोकणशाह प्रथम क्रमांक- तेजस मस्के (रंगा) अभिनय तृतीय क्रमांक- विठ्ठल तळवळकर (शांती) पार्श्वसंगीत प्रथम क्रमांक- बिलिमारो अशा प्रकारे आपल्या कलाकृतीच्या जोरावर आणि जबरदस्त सादरीकरणामुळे ‘ढ’ मंडळीनी प्रेक्षक आणि परिक्षकांची मन जिंकत बक्षीसांची लयलूट केली. यावेळी ‘ढ’ मंडळीची बिलिमारो संपूर्ण सिंधुदुर्गच नव्हे तर कोकणच प्रतिनिधित्व करीत होती. ‘नाथ पै ते अटल करंडक एकांकिका स्पर्धेपर्यंत चालू असलेल्या ‘ढ’ मंडळी आणि बिलिमारो या एकांकिकेचा प्रवास कुठेही न थांबता सर्व ठिकाणी ती अव्वल ठरली आहे. कडक सादरिकरण, मांडणी, कथा, दशावतारी साज या सर्व गोष्टींचे समीकरण एकत्र रंगमंचावर पाहताना नेत्रदीपक ठरते.

‘ढ’ मंडळींच्या वाकप्रचारानुसार “हुशार होउंन सगळ समजण्यापेक्षा, ‘ढ’ राहून नेहमी शिकत राहव” याचा पाढा म्हणत त्यांनी संधीच सोन करुन दाखवल आहे. ‘ढ’ मंडळींचे खूप खूप अभिनंदन, संधी मिळाल्यास सर्वांनीच आणि आपली लोककला विसरलेल्या प्रत्येक कोकणी माणसाने बिलिमारो ही एकांकिका नक्की पहावी.

अभिप्राय द्या..