You are currently viewing प.पु स्वामी गगनगिरी महाराज यांच्या १४ व्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न.;२५ रक्तदात्यांनी केले रक्तदान.

प.पु स्वामी गगनगिरी महाराज यांच्या १४ व्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न.;२५ रक्तदात्यांनी केले रक्तदान.

वैभववाडी /-

प.पु. स्वामी गगनगिरी महाराज यांच्या १४ व्या पुण्यतिथीनिमित्त स्वामी गगनगिरी महाराज सेवाश्रम देवगड तसेच सिंधूरक्त मित्र प्रतिष्ठान देवगड व राजेश पडवळ जनसेवा चारीटेबल ट्रस्ट वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर आज संपन्न झाले. यावेळी २५ रक्तदाते रक्तदान करत या शिबिरात सहभागी झाले .

या प्रसंगी प. पु. गगनगिरी महाराज सेवाश्रम देवगड चे संस्थापक राजाराम परब, एकात्मता वारकरी संप्रदायचे अध्यक्ष प्रकाश केशव सुतार, राजेश पडवळ जनसेवा चारीटेबल ट्रस्ट वैभववाडी चे अध्यक्ष राजेश पडवळ, सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानचे जिल्हा उपाध्यक्ष पंढरीनाथ आचरेकर, व सहसचिव रविकांत चांदोस्कर, सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान देवगड शाखा सचिव प्रकाश जाधव, परेश गोगटे, विजय परब, धाकोजी सुतार, सत्यवान दळवी, पांडुरंग सुतार, महादेव फाळके, दत्ताराम मिराशी, शेखर मिराशी, संतोष धुरी, रमेश सावंत इत्यादी मान्यवर व रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा