मालवण /-

कांदळगाव येथील समर्पित कोविड सेंटरला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. हे सेंटर तातडीने गावातून हलवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. माजी सरपंच अशोक आचरेकर यांचा सोमवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला होता. संबंधित सेंटरच्या मालवण मधील हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे त्यांना प्राण गमवावे लागल्याचा ग्रामस्थांचा आरोप असून यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. दरम्यान, या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत संबंधित डॉक्टर आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याची ग्वाही तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली आहे.

कांदळगावचे माजी सरपंच अशोक आचरेकर यांचे सोमवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्यावर शहरातील खाजगी रूग्णालयात उपचार न केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. यामुळे संबंधित रूग्णालयाचेच कांदळगाव गावात असलेले समर्पित कोविड सेंटर तात्काळ गावातून हलविण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी देत आक्रमक भूमीका घेतली आहे. मंगळवारी मोठ्या संख्येने ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयात गोळा झाले होते. आचरेकर यांच्या निधनामुळे कांदळगाव बाजारपेठ बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली होती. दरम्यान, ग्रामस्थांची आक्रमक भूमीका तहसीलदार अजय पाटणे यांनी जाणून घेवून याबाबत संबंधित खाजगी डॉक्टर आणि जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून निर्णय घेण्यात येईल, असा अश्वासन दिले. तहसीलदार यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थ शांत झाले होते. कोविड सेंटर संबंधित ट्रस्टचे पदाधिकारी चर्चेसाठी ग्रामपंचायतीमध्ये आले असताना ग्रामस्थांनी खाजगी डॉक्टर आणि हॉस्पीटलच्या विरोधात घोषणाबाजी केली. यामुळे वातावरण तंग बनले होते. यावेळी सरपंच उमदी परब, उपसरपंच आनंद आयकर, माजी सभापती सौ. सोनाली कोदे, उदय परब, रणजित परब, आनंद लाड, महेश लाड, प्रविण साटम, दिपक परूळेकर, राकेश लाड, प्रकाश लाड, संदिप पाटकर, उमेश कोदे, मनोज आचरेकर, मारूती मांजरेकर, विश्वनाथ कदम, जयवंत राणे, अमोल वारंग, मनोज परूळेकर, जीवन कांदळगावकर, अमित राणे, मोहन खोत, संतोष कांदळगावकर, शामसुंदर कांदळगावकर, यशवंत कांदळकर, शामसुंदर मुळये, शांताराम चव्हाण, प दिप चव्हाण, दिनकर सातार्डेकर, वसंत परब, संजय सुर्वे, महेश आयकर, तुषार घवाळे, सुर्यकांत मांजरेकर, परशुराम परब, राकेश लाड, रवि मांजरेकर, समिर कदम, अमोल डिचोलकर, निलकंठ मेस्त्री, प्रविण साटम, विष्णू शृंगारे, हरी मेस्त्री, नंदकिशोर मेस्त, सिद्धेश कदम, रितेश लाड, श्रीराम परब, रामचंद्र गुरव, अनिल कदम, चंद्रशेखर सुर्वे, आत्माराम मेस्त्री, मंगेश कांदळगावकर दत्तविहार कोदे, राकेश कदम, रोहन कोदे, लहू कदम, अरूण पाटील, जयराम तेली, भालचंद्र डिचवलकर, उमेश परब, विजय नारिंग्रेकर, किरण कुंभार, नंदकिशोर कांदळकर, राज कोदे, संदेश कदम यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

अशोक आचरेकर यांच्यावर योग्यप्रकारे वैद्यकीय उपचार न झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांचा मुलगा मनोज आचरेकर याने करत ग्रामपंचायती कडे एक तक्रार देत गावातील कोविड सेंटर बंद करण्याची मागणी केली. या मागणीच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीच्यावतीने संबंधित सेंटरच्या व्यवस्थापनाला चर्चेसाठी बोलाविण्यात आले होते. यावेळी रविविकरण तोरसकर यांनी कोविड सेंटरबाबत आपली बाजू ठेवली. मात्र ग्रामस्थांचे समाधान झाले नाही. त्यांनी आक्रमकपणे सेंटर बंदच करण्याची मागणी लावून धरली. आचरेकर यांचा मुलगा ऑक्सीजनसाठी अक्षरश: डोळ्यात पाणी आणून डॉक्टरांकडे याचना करत होता, मात्र त्याची दया डॉक्टरांना आली नाही. यामुळे अशा डॉक्टरांचे कोविड सेंटर आम्ही गावात चालवू देणार नाही. यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील, अशी आक्रमक भूमीका उमेश कोदे यांनी घेतली. तर उदय परब यांनी आचरेकर यांच्या मृत्यूची चौकशी करून संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली. सरपंच उमदी परब यांनी आपण ग्रामस्थांच्या बाजुने असून ग्रामस्थांच्या मागणीबाबत तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

तहसीदार अजय पाटणे व प्रभारी पोलीस अधिकारी सचिन चव्हाण यांनी कांदळगाव ग्रामपंचायतीमध्ये येत ग्रामस्थांच्या भावना जाणून घेतल्या. यावर जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट केले. तसेच मनोज आचरेकर याच्याशीही त्यांनी चर्चा केली. यावेळी ग्रामपंचायत आवारात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोविड सेंटर बंद न करण्यात आल्यास ग्रामस्थ आक्रमकपणे आंदोलन छेडतील असाही इशारा यावेळी देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page