मालवण /-
मालवण तालुक्यात मंगळवारी आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडून आले. यात शहरातील ६ तर ग्रामीण भागातील २ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा २५८वर पोहचला आहे. मालवण शहरात सापडलेल्या रुग्णांमध्ये सोमवार पेठ २, वायरी १, दांडी १, बांगीवाडा १, मेढा १ अशा रुग्णांचा समावेश आहे. यात शहरातील एका युवा व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. तर ग्रामीण भागात चौके येथे १ व श्रावण येथे १ रुग्ण सापडला. चौके येथील व्यक्ती ही ओरोस येथे कामास असून त्याठिकाणी त्यास कोरोनाची लागण झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत १९१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या ५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.