कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांचे मृतदेह वाहतुकीसाठी खाजगी रुग्णवाहिका अधिग्रहित..

कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांचे मृतदेह वाहतुकीसाठी खाजगी रुग्णवाहिका अधिग्रहित..

सिंधुदुर्गनगरी /-

कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृतदेहाची वाहतूक करण्यासाठी रुग्णवाहिका धारक तयार होत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने कोविड मुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृतदेहांची वाहतूक करण्यासाठी खाजगी रुग्णवाहिका अधिग्रहित केली आहे. विशाल विलास जाधर यांची रुग्णवाहिका यासाठी अधिग्रहित करण्यात आली आहे. तरी अशा प्रकारे मृतदेहाची वाहतूक करण्यासाठी विशाल जाधव यांच्याशी 8149822015, 7030397514 किंवा नागेश ओरसकर यांच्याशी 9422596691, 9284505866 या क्रमांकावर संपर्क साधावा. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या निर्देशानुसार आदेश दिले आहेत.

अभिप्राय द्या..