You are currently viewing शिरोडा विकास सेवा सोसायटी चेअरमन पदी राजन गावडे यांची एकमताने निवड.

शिरोडा विकास सेवा सोसायटी चेअरमन पदी राजन गावडे यांची एकमताने निवड.

वेंगुर्ला /-


शिरोडा विकास सेवा सोसायटी चेअरमन पदी राजन जनार्दन गावडे यांची एकमताने बिनविरोध निवड झाली. त्यांची निवड होताच त्यांचे वेंगुर्ले पंचायत समिती उपसभापती सिद्धेश उर्फ भाई परब यांनी त्यांचे अभिनंदन केले.यावेळी व्हाईस चेअरमनपदी शितल राजेश साळगांवकर यांची निवड करण्यात आली.आज १६ जानेवारी रोजी कोव्हिड नियमांचे पालन करुन शिरोडा विकास सेवा सोसायटी ची निवडणूक पार पडली. या निवडणूक प्रक्रियेत निरीक्षक म्हणून एस. एल. कावले यांनी काम पाहिले.यावेळी सोसायटीचे संचालक दत्तगुरु परब,तुकाराम परब,विजय पडवळ,दिगंबर गावडे,दिलीप मठकर,राजू आंदुर्लेकर, रेशमी डीचोलकर,दिपश्री गावडे,शिवराम मयेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा