You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा सरचिटणीसपदी ऐन्थोनी फर्नांडिस यांची निवड.

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा सरचिटणीसपदी ऐन्थोनी फर्नांडिस यांची निवड.

सावंतवाडी /-

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा सरचिटणीसपदी ऐन्थोनी फर्नांडिस याची नियुक्ती करण्यात आली आहे. अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष जवादहुसेन खतिब यांनी आज त्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांची नियुक्ती जाहीर केली.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष तथा दोडामार्ग तालुका प्रभारी निरीक्षक शफीक खान, अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष नजिर शेख, जिल्हा चिटणीस आसिफ ख्वाजा, जिल्हा उपाध्यक्ष इफ्तीहार राजगुरू, सावंतवाडी तालुका अध्यक्ष जावेद शेख, युवती तालुका अध्यक्ष जहिरा ख्वाजा आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा