You are currently viewing जिल्हा बँक निवडणूक वादातून मारहाण करणाऱ्यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर,दोडामार्गमध्ये प्रवीण नाडकर्णी यांना केली होती मारहाण..

जिल्हा बँक निवडणूक वादातून मारहाण करणाऱ्यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर,दोडामार्गमध्ये प्रवीण नाडकर्णी यांना केली होती मारहाण..

शैलेश दळवीसह अन्य तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्याने अटकेची टांगती तलवार..

सिंधुदुर्ग /-

जिल्हा बँक निवडणुकीच्या वादातून दोडामार्ग येथे प्रवीण अनंत नाडकर्णी यांना दांड्याने मारहाण करून गाडीची तोडफोड केल्याचा गुन्हा दाखल असणाऱ्या जिल्हा बँक माजी उपाध्यक्ष सुरेश दळवी यांचा मुलगा शैलेश सुरेश दळवी, पराशर जगन्नाथ सावंत, लक्ष्मण उर्फ बाळा सखाराम नाईक, श्रीकृष्ण उर्फ प्रवीण तुळशीदास गवस या चौघा आरोपींचा अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायालयाने आज फेटाळला. सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. फिर्यादी पक्षातर्फे वकील भरत प्रभू यांनी युक्तिवाद केला.

प्रवीण नाडकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जिल्हा बँक निवडणुकीच्या वादातून दोडामार्ग एसटी स्टँड समोर प्रवीण नाडकर्णी यांना लाकडी दांड्याने व दगडाने डोक्याला मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच चारचाकी गाडीचीही दगड व दांड्याने मारहाण करून तोडफोड केली होती. ही घटना 2 जानेवारी, 2022 रोजी रात्री 10 वा. 20 मिनिटांनी घडली होती. मारहाणीत जखमी झालेल्या प्रवीण नाडकर्णी यांच्या फिर्यादीनुसार चेतन सुभाष चव्हाण वय-38 रा. कसई दोडामार्ग सुरुचीवाडी, 2) दिपक ऊर्फ रामा दशरथ गवस वय-35 रा. खोक्रल भटवाड़ी, 3) देवा रामचंद्र शेटकर, रा. खोक्रल भटवाडी, 4) पराशर जगन्नाथ सावंत वय 37, रा. कोनाळकटटा तिलारीवाडी, 5) शैलेश सुरेश दळवी वय-38 रा. दोडामार्ग सुरुचीवाडी, 6) लक्ष्मण ऊर्फ बाळा सखाराम नाईक वय- 52 रा. उसप 7) श्रीकृष्ण ऊर्फ प्रविण तुळशीदास गवस वय-36 रा. मणेरी, 8) समीर शशीकांत रेडकर वय- 35 रा. दोडामार्ग सावंतवाडा यांच्यावर भा. दं. वि. 307, 143, 144, 147, 148, 149, 188, 427, 504, 506 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) (अ), 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी आरोपीनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.

अभिप्राय द्या..