You are currently viewing तिवरे सरपंच लतिका महाडेश्वर यांचा राजीनामा

तिवरे सरपंच लतिका महाडेश्वर यांचा राजीनामा

कणकवली /-

तिवरे सरपंच लतिका महाडेश्वर यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला आहे. वर्षभरापूर्वी लतिका महाडेश्वर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी काही दिवसांपूर्वी कणकवली सभापतींकडे सरपंच पदाचा राजीनामा दिला होता.सभापतींनी तो राजीनामा मंजूर केला होता. त्यानंतर आज मासिक सभेत या राजीनाम्याचे वाचन करण्यात आले व अखेर तो राजीनामा मंजूर झाला.मात्र लतिका महाडेश्वर यांनी अचानक राजीनामा देण्याचे कारण मात्र गुलदस्त्यात राहिले आहे.ग्रामपंचायत सदस्य व भाजपाच्या वतीने महाडेश्वर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कारही करण्यात आला.

लतिका महाडेश्वर या थेट सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या व त्यानंतर त्यांनी काही काळातच शिवसेनेत प्रवेश केला होता.आज त्यांचा सत्कार करताना तिवरेचे उपसरपंच भाई आंबेलकर,ग्रा. पं.सदस्य अर्जुन चव्हाण,गजानन सुतार,सुनयना वाळवे,अनिता चव्हाण,प्रमिला गुरव,भाजपा बूथ अध्यक्ष रघुनाथ चव्हाण, सुदर्शन फोपे,ग्रामसेवक गंगाराम बोडेकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..