देवगड /-

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देवगड तालुका मुख्याध्यापक संघाने आयोजित केलेल्या माध्यमिक शाळातील पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा दोन गटात घेतलेल्या रंगभरण स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. या स्पर्धेत पाचवी ते सातवी गट प्रथम:- आर्या विनोद चौगुले (देवगड हायस्कूल) द्वितीय:- कल्पक दत्ताराम कोकरे (पडेल हायस्कूल) तृतीय :-वेदांत दत्तात्रय साळुंके (तळेबाजार हायस्कूल) उत्तेजनार्थ स्वराली सागर मेणे (शिरगाव हायस्कूल) तन्मय सूर्यकांत तिवारणे (कोळोशी हडपीड हायस्कूल), समर्थ गणपत घाडी (गिर्ये हायस्कूल), आर्या सत्यवान जोईल (किंजवडे हायस्कूल), अनुराधा आनंद कदम (मुणगे हायस्कूल). आठवी ते दहावी गट:- प्रथम तेजश्री संदीप डोळकर (गिर्ये हायस्कूल), द्वितीय गौरी दत्तात्रय सावंत (शिरगाव हायस्कूल) तृतीय:- यश विनोद सावंत (मुणगे हायस्कूल), उत्तेजनार्थ आचल राजेश वर्मा (देवगड हायस्कूल), तन्वी उमेश ओंबळकर (तळेबाजार हायस्कूल), रिद्धी शामसुंदर जुवाटकर (जामसंडे हायस्कूल), प्रज्ञा प्रशांत कांबळी (किंजवडे हायस्कूल), रिया श्रीकांत नाईक धुरे (इंग्लिश मीडियम देवगड) या विद्यार्थांनी यश संपादन केले आहे.

या स्पर्धेमध्ये तालुक्यातील 2430 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे परीक्षण दिपीका पालकर (जामसंडे नं. 1) व संदीप परब (तारामुंबरी शाळा) यांनी केले. या स्पर्धेचे परीक्षक या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाची तारीख, वेळ व स्थळ याबाबतची माहिती विजेत्यांना नंतर कळविण्यात येईल. सर्व विजेत्यांचे देवगड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष दिलीप घरपणकर, सचिव संजीव राऊत, स्पर्धा समिती प्रमुख माधव यादव तसेच सर्व तालुका कार्यकारिणीने अभिनंदन केले आहे. या स्पर्धेसाठी मार्गदर्शन करणाऱ्या सर्व चित्रकला शिक्षकांचेही संघटनेच्यावतीने जाहीर आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page