You are currently viewing भाजपा जिल्हा कार्यकारिणीची बैठक उद्या महिला भवन ओसरगाव येथे बैठक.;केंद्रीय मंत्री नारायण राणे करणार मार्गदर्शन.

भाजपा जिल्हा कार्यकारिणीची बैठक उद्या महिला भवन ओसरगाव येथे बैठक.;केंद्रीय मंत्री नारायण राणे करणार मार्गदर्शन.

सिंधुदुर्ग /-सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा कार्यकारिणी बैठक बुधवार दिनांक १२ जानेवारी, २०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता महिला भवन ओसरगाव कणकवली येथे संपन्न होत आहे. या बैठकीला भाजपा नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे व इतर भाजपा नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीला सर्व जिल्हा पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, सर्व मोर्चा/आघाडी जिल्हाअध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मंडल अध्यक्ष, मंडल सरचिटणीस यांनी उपस्थित राहणे अपेक्षित आहे. सर्वांनी बैठकस्थळी वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा