You are currently viewing कुडाळ नगरपंचायतीच्या उर्वरित ४ प्रभागांमध्ये १८ जानेवारीला मतदान..

कुडाळ नगरपंचायतीच्या उर्वरित ४ प्रभागांमध्ये १८ जानेवारीला मतदान..

कुडाळ /-

कुडाळ नगरपंचायतीच्या उर्वरित ४ प्रभागांमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये आता रिंगणात १३ पैकी ९ उमेदवार असणार असून ३ उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली आहे तर प्रभाग १६ चे भाजपचे उमेदवार सुधीर चव्हाण यांचे निधन झाल्याने या प्रभागात एकास एक लढत होणार आहे.

कुडाळ नगरपंचायतीच्या १७ जागांपैकी १३ जागांची निवडणूक २१ डिसेंबर रोजी झाली होती. त्यानंतर ओबीसी आरक्षणाखाली असलेल्या ४ प्रभागांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणावर स्थगिती आल्यानंतर १८ जानेवारी रोजी निवडणूक होणार. या निवडणुकीमध्ये ४ जागांसाठी उमेदवारी अर्ज मागविण्यात आले. यामध्ये १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते दरम्यान आज (सोमवार १० जानेवारी) रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत होती या मुदतीमध्ये प्रभाग क्रमांक १७ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील भोगटे व काँग्रेसचे उमेदवार ऋषिकेश कांबळी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले तसेच प्रभाग क्रमांक ३ मधील अपक्ष उमेदवार नेत्रा नागेश नेमळेकर यांनी देखील उमेदवारी अर्ज मागे घेतले त्यामुळे प्रभाग क्रमांक १७ मध्ये भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार असून, महाविकास आघाडी या प्रभागात भाजप विरोधात उतरणार आहे तसेच प्रभाग क्रमांक ३ मध्ये सुद्धा भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत असणार आहे या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते नागेश नेमळेकर यांनी आपल्या पत्नीची अपक्ष उमेदवारी दाखल केली होती या ठिकाणी ही बंडखोरी थांबवण्यामध्ये भाजपला यश मिळाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा