You are currently viewing आर टी पी सी आर टेस्टच्या सक्तीमुळे सर्वसामान्य जनतेला फटका.;भाजप शहरअध्यक्ष अजय गोंदावळे यांनी वेधले प्रांताधिकारी यांचे लक्ष !

आर टी पी सी आर टेस्टच्या सक्तीमुळे सर्वसामान्य जनतेला फटका.;भाजप शहरअध्यक्ष अजय गोंदावळे यांनी वेधले प्रांताधिकारी यांचे लक्ष !

सावंतवाडी /-

सावंतवाडी नगरपालिकेतील कोणत्याही विभागात किंवा मुख्याधिकारी यांना भेटण्यासाठी आर टी पी सी आर टेस्ट ची सक्ती केल्याने त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत असून, साधे पाणी बिल किंवा घरपट्टी भरणे कठीण झाले आहे. याबाबत निर्माण होणाऱ्या समस्या दूर करण्यात याव्यात अशी मागणी भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. प्रसिद्ध पत्रकात असे नमूद करण्यात आले की मुख्याधिकारी यांच्यावर असलेला अतिरिक्त भार कमी करण्यात यावा आणि त्यांना सावंतवाडी नगरपालिकेसाठी वेळ देण्यास सांगण्यात यावे अशी मागणी केली आहे.

यावेळी माजी नगरसेवक आनंद नेवगी, युवा मोर्चा चिटणीस बंटी पुरोहित, बंड्या कोरगावकर, महेश पांचाळ विनोद सावंत आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..