You are currently viewing आडेलीत आढळला कोलगावातील बेपत्ता प्रौढाचा गळफास लावलेला मृतदेह..

आडेलीत आढळला कोलगावातील बेपत्ता प्रौढाचा गळफास लावलेला मृतदेह..

वेंगुर्ले /-

सावंतवाडी-कोलगाव येथून बेपत्ता झालेल्या प्रौढाचा मृतदेह आडेली – खुटवळवाडी येथे गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला आहे. ही घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. महादेव विजय नाईक (५०) रा. चव्हाटावाडी, असे त्यांचे नाव आहे. ते ४ जानेवारी पासून बेपत्ता होते. याबाबत त्यांचा भाऊ अरूण विजय नाईक यांनी दिलेल्या खबरी नुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात बेपत्ताची नोंद करण्यात आली होती. दरम्यान आज त्यांचा गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आली आहे. तर घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

बेपत्ता महादेव नाईक हे ४ जानेवारीला दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घरात कोणाला काहीही न सांगत निघून गेले होते. दरम्यान त्यांचा थांगपत्ता न लागल्याने सावंतवाडी पोलिस ठाण्यात त्यांच्या भावाने बेपत्ताची खबर दिली होती. ते मनोरुग्ण असल्याचे नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले होते. त्यानुसार तपास सुरू असताना आडेली येथे झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत आज त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच आलडेली माजी सरपंच प्रकाश गडेकर, शिवसेना ओबीसी सेल तालुकाध्यक्ष नितीन मांजरेकर, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गडेकर यांच्यासह स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

अभिप्राय द्या..