वैभववाडी /-
नवीन कुर्ली वसाहत, फोंडाघाट येथील रहिवासी डॉ. रत्नाकर लीलाधर पेडणेकर यांनी सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य व राजकीय क्षेत्रात उत्कृष्ठ काम केले.गोर गरीब जनतेला वैद्यकीय सेवा देण्यास ते अग्रेसर होते.त्यांच्या निधनाने कुर्ली व नवीन कुर्ली गावच्या सर्वच क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.अशा शब्दात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
नवीन कुर्ली येथील रहिवाशी,समाजकारणातील सक्रिय कार्यकर्ते श्री.समर्थ उपासनेचे उपासक अशी त्यांची ओळख होती. नवीन कुर्लीतील ग्रामस्थ व नवदुर्गा युवा मंडळाकडुन शोकसभेचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.पेडणेकर यांच्या जुन्या आठवणीना अनेकांनी उजाळा दिला.
रविंद्र नवाळे,राजेंद्र कोलते,कृष्णा परब,कृष्णा पोवार,प्रदिप कामतेकर,धीरज हुंबे,सदाशिव राणे,प्रकाश भोगले,सुनिल कदम,निलेश पोवार,पांडुरंग चव्हाण,आनंद सावंत,अरुण पिळणकर,अविनाश चव्हाण,अमित दळवी यांनी मनोगत व्यक केले.
या वेळी दादा गावकर,अंकुश पिळणकर,अनंत डवुर,शशिकांत परब,भगवान तेली,मारुती कदम,पांडुरंग चव्हाण,बाळकृष्ण दळवी,दाजी सुतार,एकनाथ चव्हाण,प्रदिप आग्रे, विजय कोलते,अमित दळवी,चंद्रकांत तेली,सचिन परब,बाबु हसणेकर,सचिन साळसकर,अतुल डवुर,अनिल दळवी,संजय परब,गुरुदत्त मडव आदी ग्रामस्थ व युवा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.