सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक प्रचारात १८ डिसेंबर रोजी कणकवलीत शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य संशयीत आरोपी सचिन सातपुते यास गजाआड करण्यात आले आहे. सातपुते याला सिंधुदूर्ग ग्रामिण पोलिसांनी दिल्लीमधून मोठ्या शिताफीने अटक केल्याची माहिती मिळत आहे.

सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो. त्याने 2017 मध्ये पुणे महापालिकेची निवडणूक भाजपकडून लढविली होती.

आमदार नितेश राणे, हाजिर हो! पोलिसांनी नोटीस धाडल्यानं राजकारण तापलं ,संतोष परब यांच्यावर हल्ला केल्यानंतर सचिन सातपुते त्याचा मोबाईल फोन बंद करून होता फरार झाला होता. त्याचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. या आधी या प्रकरणात एकूण चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्वजण खराडी-चंदननगर परिसराती असल्याचे कळते आहे. सातपुते याला सिधुदूर्ग ग्रामिण पोलिस आज कणकवली किंवा कुडाळ पोलिस स्टेशनला हजर करणार असल्याचीही माहीती मिळत आहे. नितेश राणे यांची याच प्रकरणी दोन दिवस कणकवली पोलिसांनी चौकशीही केली आहे.

नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर सामनामधून कठोर टीका त्यांच्यावर करण्यात आली होती. त्या वेळी पुण्यातील सामना कार्यालय फोडण्याच्या आरोपामध्ये सचिनला अटक करण्यात आली होती. त्याला अटक होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव पोलिसांवर होता. मात्र पोलिसांनी अखेरीस त्यास पकडले.. सातपुते हा कोणाच्या संपर्कात होता, याचा तपास पोलिस आता घेत आहेत.
नितेश राणे यांची पोलिसांनी या प्रकरणी चौकशी केली होतीअतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्ष, उपअधीक्षक, पोलिस निरीक्षत अशा तिघांनी पाऊण तास ही चौकशी केली. या चौकशीला आपण सर्वतोपरी सहकार्य केल्याचे राणे यांनी नंतर सांगितले. यापुढेही चौकशीसाठी बोलविल्यानंतर हजर राहणार असल्याचे आश्वासन पोलिसांना दिले आहे. जी माहिती पोलिसांना हवी होती ती दिली असल्याचे ही सांगितले.अतिरिक्त SP, DySP आणि पोलिस निरीक्षक अशा तिघांकडून नितेश राणेंची कसून चौकशी

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख म्हणू संतोष परब काम पाहत होते. त्यांच्यावर 18 डिसेंबर रोजी हल्ला झाला होता. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार नीतेश राणे यांच्यावर या प्रकरणी आरोप केले होते. हहल्ला प्रकरणामागे एकूण सात संशयित असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील पाचजणांना अटक केली आहे. उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे. कणकवली रेल्वे स्थानकालगत नरडवे रस्त्यावर शनिवारी (ता. १८ डिसेंबर) सकाळी अकराच्या सुमारास संतोष परब यांच्या मोटारसायकलला धडक दिल्याने ते खाली पडल्यानंतर त्यांच्यावर एका तरुणाने चाकू हल्ला केला. त्यानंतर संशयित मोटारचालकाला फोंडाघाट चेकपोस्टवर पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page