You are currently viewing शेतक-यांची जिल्हा बॅंकेचा सांभाळ सहकारमहर्षी शिवराम भाऊ जाधव यांच्या नंतर सतिश सावंत करु शकतात.;अतुल बंगे

शेतक-यांची जिल्हा बॅंकेचा सांभाळ सहकारमहर्षी शिवराम भाऊ जाधव यांच्या नंतर सतिश सावंत करु शकतात.;अतुल बंगे

कुडाळ /-

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक ही या जिल्ह्य़ातील शेतक-यांची हक्काची बॅंक असुन ही बॅक सांभाळण्याची जबाबदारी सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव यांच्या नंतर सहकारातील अनुभवी म्हणून जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत हेच घेऊ शकतात असा विश्वास शिवसेनेचे अतुल बंगे यांनी व्यक्त केला श्री बंगे यांनी आज सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुक दरम्यान जे विरोधक कलुशित वातावरण करीत आहेत यावर आपली प्रतिक्रिया देताना बंगे म्हणाले सतिश सावंत हे स्वाभिमान पक्ष सोडुन खासदार विनायक राऊत माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश केल्या पासुन कधी मागे वळुन न पहाता सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक शेतक-यांची बॅक असल्याने आतापर्यंत नारायण राणे यांचे थोकादायक निर्णय लाथाडुन जिल्हा बॅंकेचे हीत सांभाळत असताना दादागिरी, मारामारी, धनशक्ती या सगळ्या गोष्टींना सामोरे जात असताना कै शिवराम भाऊ जाधव यांच्या नंतर सहकारातील हुशार व्यक्ती म्हणून काम करताना आज अनेक प्रसंगातून जात आहेत म्हणुनच शिवसेना अखंड श्री सावंत यांच्या खंबीर पणे पाठीशी असुन सतिश सावंत यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे पॅनेल निवडुन येणार असेही श्री बंगे यांनी सांगितले

अभिप्राय द्या..