You are currently viewing दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग मनोहर मनसंतोष गड संवर्धन मोहीम क्रमांक ८ गडावरील जाणाऱ्या वाटेवर बाक बसविणे उपक्रम पुर्ण..

दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग मनोहर मनसंतोष गड संवर्धन मोहीम क्रमांक ८ गडावरील जाणाऱ्या वाटेवर बाक बसविणे उपक्रम पुर्ण..

कुडाळ /-

गेल्या वर्षभरापासून दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागाची नियोजित असणारी मोहीम म्हणजेच मनोहर मनसंतोष गडावर जाणाऱ्या वाटेवर बाक बसविणे आज दिनांक २५ डिसेंबर २०२१ रोजी संपन्न झाली.

मे मध्ये नियोजित असलेल्या या मोहिमेला कोविड 19 मुळे असलेल्या संचारबंदीमुळे पुढे ढकलण्यात आली, त्यात पावसाळा लवकर सुरू झाल्याने दिवाळीनंतर ही मोहीम राबविण्याचे ठरले. दिवाळीनंतर ही पाऊस सुरू होता त्यामुळे ही मोहीम डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात २५ व २६ या दिवशी घेण्याचे ठरले.

शिरशिंगे गोठवेवाडी येथील श्री सुरेश शिर्के मित्रमंडळाच्या मावळ्यांच्या सहकार्यामुळे २२ डिसेंबरलाच सर्व बाक नियोजित ठिकाणी ठेवण्यात आलेले होते. यामुळे दोन दिवसांची ही मोहीम एका दिवसात पूर्ण करण्याच्या उद्देशाने शनिवारी सकाळीच दुर्ग मावळाचे सर्व मावळे गडाच्या पायथ्याखाली जमले. सिमेंट, वाळू, खडी, पाण्याची कॅन मावळे बाकांच्या नियोजित ठिकाणी समान दोन ते तीन फेऱ्यामध्ये घेऊन गेले. त्याच वेळी बाक बसवण्यासाठी आवश्यक सपाटीकरण तसेच खड्डे मारण्यात आले. अशाप्रकारे एक-एक करून बाक बसविण्यात आले. यावेळी गडावर भ्रमंती करायला आलेल्या विलवडे येथील युवकांनी खडी तसेच वाळू आणण्यासाठी मदत केली.

यावेळी कोकण विभाग अध्यक्ष गणेश नाईक, महिला अध्यक्ष वेदिका मांडकूलकर, सामाजिक उपक्रम विभाग अध्यक्ष समीर धोंड, कोकण विभाग उपाध्यक्ष लिनेश धुरी, सरचिटणीस सुनिल करडे, जिल्हाध्यक्ष प्रसाद सुतार, सावंतवाडी तालुकाध्यक्ष सुनिल धोंड, मनोहर मनसंतोष गड संवर्धन प्रमुख रोहन राऊळ व प्रणय राऊळ, बाक बसवण्यासाठी विशेष मेहनत घेणारे प्रसाद मेस्त्री, शैला मांडकुलकर, सोनाली परुळेकर, विशाल परब, नारायण कविटकर, सहदेव निवळे इत्यादी उपस्थित होते.

या बाक बसवण्याच्या उपक्रमासाठी श्री पंकज प्रमोद गावडे व श्री साईराज हेमंत जाधव (गिअर अप जिम कुडाळ), श्री समीर शशिकांत धोंड (शिरशिंगे), रोटरी क्लब ऑफ कुडाळ, स्व. सरस्वती राजाराम राऊळ हिच्या स्मरणार्थ सौ.अनुराधा भिकाजी नाईक (महादेवाचे केरवडे) यांनी प्रत्येकी एक बाक, तसेच विद्या राऊळ, सच्चिदानंद राऊळ, महेश निकम, मिलिंद जाधव, अमोल परब, सुभाष वसावे, स्वप्निल पालव, समता वारंग, रामचंद्र नाईक, निलाक्षी चव्हाण, आनंद धुरी, प्रकाश कडव, राजन कडव, राजाराम कविटकर, सुंदर राऊळ, अभिनव भिंगारे, सुनिल धोंड, विनायक चव्हाण, शुभांगी पेडणेकर राऊळ, अमेय देसाई, सुभाष राऊळ, उत्कर्षा वेंगुर्लेकर, अनंत वसंत शिर्के, तानाजी कुंभार यांनी आर्थिक मदत केली. विशेष सांगावेसे म्हणजे शमिका चिपकर या छोट्या मुलीने आपल्या पॉकेट मनीमधून १००० ₹ ची मदत या उपक्रमास केली. प्राथमिक शिक्षक श्री चेतन बघमारे सर यांनी बाकांवर विनामूल्य लेखन करून मदत केली. शिरशिंगे ग्रामपंचायत तसेच शिवापूर ग्रामपंचायत सरपंच यांनी बाक बसविण्यास परवानगी पत्र दिले. वरील सर्व मदत करणाऱ्या व्यक्ती तसेच संस्थांचे दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे खूप आभार मानण्यात आले आहेत.शाप्रकारे दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागाची मोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाली.

अभिप्राय द्या..