You are currently viewing थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर एक्साईज ची ” मोठी कारवाई अवैध दारुसह तब्बल ६४ लाखांचा मुद्देमाल जप्त

थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर एक्साईज ची ” मोठी कारवाई अवैध दारुसह तब्बल ६४ लाखांचा मुद्देमाल जप्त

सावंतवाडी /-

राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाचे विभागीय उपआयुक्त वाय. एम. पवार यांच्या सूचनेनुसार तसेच राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली एक्साईज पथकाने इन्सुली तपासणी नाका येथे 23 डिसेंबर रोजी केलेल्या कारवाईत विदेशी दारूसह ६४,७१,३६० रु. किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्यातील आरोपी पंजाबराव बाबुराव लोखंडे (वय ४९, रा. अनिल नागदिवे, नागपुरे स्कूल जवळ, साईनगर भारत नगर, नागपूर) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ). (ई) ९०, १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्ट्रा टेम्पो क्र. MP GA ३६३५ मध्ये विविध ब्रँडच्या गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या १८० मि. ली. मापाच्या ७८३ बॉक्स, ७५० मि. ली. मापाच्या ५२ बॉक्स, ५०० मि. ली. मापाच्या बिअरचे गोवा बनावटीच्या एकूण ४२ बॉक्स आणि दारु वाहतूक कामी वापरण्यात आलेला सहाचाकी अल्ट्रा टेम्पो क्र. MP 08 GA 3635 असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या विदेशी मद्याची एकूण किंमत ४४,६१,३६०/- रु. व दारु वाहतूक कामी वापरण्यात आलेल्या वाहनांची किमत २०,००,०००/- रु. व वियो कंपनीचा एक अँड्रॉइड मोबाईल असा अंदाजे ६४,७९,३६०/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

डॉ. बी. एच. तडवी अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनानुसार दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील यांनी वरील कारवाई केली. या कारवाईमध्ये परिविक्षाधीन उप अधीक्षक आर. ए. इंगळे, सहा. दुनि. गोपाळ राणे, जवान नि. वाहन चालक संदीप कदम तसेच राज्य उत्पादन शुल्क मिरज कार्यालयातील दुय्यम निरीक्षक जितेंद्र पवार, दुय्यम निरीक्षक अभिनंदन कांबळे, जवान संतोष बिराजदार, जवान स्वप्नील आटपाडकर यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा अधिक तपास दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील करीत आहेत.

अभिप्राय द्या..