न्यू इंडिया इन्शुरन्सकडून जेठे कुटुंबीयांना अपघात विमा धनादेश प्रदान.

न्यू इंडिया इन्शुरन्सकडून जेठे कुटुंबीयांना अपघात विमा धनादेश प्रदान.

न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून संतोष आप्पाजी जेठे रिक्षाचा विमा काढला होता. त्यांचे १७ जूनला अपघाती निधन होते. त्यानुसार संतोष जेठे यांच्या वारसांना वैयक्तिक अपघात विमा धनादेश पत्नी सोनाली जेठे यांच्याकडे प्रदान करण्यात आले.

न्यू इंडिया एन्सोरन्स कंपनीचे डिव्हिजन मॅनेजर सतीश रानडे,विकास अधिकारी संतोष प्रभू,सॅमसोन जोहोन,दावा विभागप्रमुख अक्षय माईन या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर क्लेमला मंजुरी दिली. त्या क्लेमचा धनादेश कणकवली शाखाप्रमुख अविनाश तलचेरी यांनी संतोष जेठे यांचे वारस पत्नी सोनाली जेठे,सानिका जेठे,अक्षत जेठे यांना देण्यात आले. यावेळी पत्रकार भगवान लोके,लक्ष्मण लोके,न्यू इंडिया सहाय्यक प्रशासनप्रमुख अंकुश भगत, धीरज उपरे,विमा प्रतिनिधी सुनील वर्दम आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..