महाराष्ट्र राज्यातील महावितरण,महापारेषण व महानिर्मिती कंपनी मधिल वि.क्षे.तांञिक कामगार युनियन ही सामाजिक बांधिलकी जोपासणारी संघटना असून कामगारांच्या हक्काबरोबर कर्तव्याची जाणिव जपणारी संघटना आहे.सिमेवरील सैनिक व कोविड १९ ह्या संकटाचा विचार करून दि. ०४ सप्टेंबर रोजीच्या संघटनेच्या ‘४३’ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने दि.२८ऑगस्ट ते ०४ सप्टेंबर या कालावधीत महाराष्ट्रात रक्तदान शिबीराचा उपक्रम राबविण्यात येत आहे.दि. ३१ ऑगस्ट व दि ०३सप्टेंबर ला सिंधुदुर्ग मधिल तांञिक कामगार व हितचिंतक यांनी स्वेच्छेने रक्तदान केले,या उपक्रमा साठी वि.क्षे. तांञिक कामगार युनियन सिंधुदुर्ग- महावितरण चे मंडल सचिव श्री.आर.जी. ठाकुर,श्री.सतिष नाईक,श्री.व्ही. टी. सावंत,श्री.मकरंद कोचरेकर तसेच महापारेषण चे मंडल सचिव श्री.मुकुंद मुंडले,श्री.केदारी मांडे यांनी नियोजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page