You are currently viewing हडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन..

हडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन..

मालवण /-

लायन्स क्लब मालवण, मातृत्व आधार फांउडेशन व लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २३ डिसेंबर रोजी हडी ग्रामपंचायत येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरामध्ये नेत्र तपासणी व उपचार, अस्थिरोग तपासणी सांधेदुखी गुडघे दुखी तपासणी व उपचार तसेच मधुमेह तपासणी, उच्च रक्तदाब तपासणी करण्यात येणार आहे. तरी गरजू नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..