मालवण /-

‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेमुळे महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या मालवण तालुक्यातील कोईल गावच्या श्री गणपती मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून नवीन वास्तूचा कलशारोहण सोहळा दि. २७, २८ व २९ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.

यानिमित्त सोमवार दि. २७ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून गणपती पूजन व पुण्याहवाचन मातृका पूजन, नांदीश्राध्द नवग्रह पीठ, वास्तूपीठ, रुद्रपीठ आवाहन व पूजन, नवग्रह, वास्तू व रुद्र देवता हवन, क्षेत्रपाल देवता बलिदान, सुत्रवेष्टन श्रींच्या मंदिराभोवती कलश फिरवणे, पूर्णाहुती नैवेद्य, महाप्रसाद, श्रीं च्या कलशाचा धान्यदिवस, ढोल ताशाच्या गजरात कलशाची मिरवणूक, नामस्मरण, दिंडी भजन स्पर्धा आदी कार्यक्रम होणार आहेत. मंगळवार दि. २८ रोजी श्री गणेश पूजा, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राध्द, नवग्रह पीठ, ब्रह्मादी मंडळ पीठ, गणेश याग पीठ, आवाहन पूजन, शिलालेख उद्घाटन समारंभ, श्री गणेश चरणी अभिषेक व सहस्त्र आवर्तने कलश अभिषेक व कलशारोहण, नैवेद्य व आरती, महाप्रसाद, नामस्मरण (संध्याकाळी ६.३०), दिपोत्सव (संध्याकाळी ७ वा.), सत्कार समारंभ / स्मरणिका प्रकाशन, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तर बुधवार दि. २९ रोजी श्री गणेश पूजा, नवग्रह पीठ, ब्रह्मादी मंडळ पीठ, देवतांची नित्य पूजा, अग्नि स्थापना, नवग्रह, श्री गणेश याग हवन, श्री क्षेत्रपाल देवता बलिदान व पूर्णाहुती, महानैवेद्य व आरती, श्री सत्यनारायण पूजा (४ वाजता) किर्तन (सायं. ६ वाजता), वाद्यवृंद – ऑर्केस्ट्रा – मराठी पाऊल पडते पुढे (रात्रौ ९ वा.) आदी – कार्यक्रम होणार आहेत. तरी भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटीतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page