You are currently viewing ना.शरद पवार यांचे कार्य उल्लेखनीय : एम.के.गावडे.

ना.शरद पवार यांचे कार्य उल्लेखनीय : एम.के.गावडे.

वेंगुर्ला / –

महाराष्ट्र मध्ये आर्थिक उन्नती आणण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यामार्फत सुरू आहे. देशातल्या मान्यवरांनी त्यांच्या नेतृत्वाचे पैलू उलगडले आहेत.  त्यांच्या नेतृत्वाचा फायदा आज सहकारामध्ये मोठ्या प्रमाणात होत असून कोकणच्या शेतकऱ्यांना सधन करण्याचे काम शरद पवार यांनी केले आहे.८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण म्हणून या पक्षाचे काम सुरु असून, जनतेच्या हितासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी सांभाळून सर्वांनी एकत्र येऊन पक्ष वाढवूया.युवाशक्तीचा उपयोग संघटना वाढीसाठी करा,असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य तथा सहकारातील ज्येष्ठ नेते एम.के.गावडे यांनी वेंगुर्ले येथे केले.राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी पक्ष कार्यालय येथे साजरा करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.यावेळी प्रदेश महिला सचिव नम्रता कुबल,वेंगुर्ले शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर,जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा परब, जिल्हा कार्यकारणी सदस्य नितीन कुबल,रयत शिक्षण संस्थेचे  ऍंथोनी डिसोजा,जिल्हा चिटणीस मकरंद परब,उपाध्यक्ष योगेश कुबल,तालुका महिला अध्यक्ष दीपिका राणे,शहर सचिव स्वप्निल रावल,शहर उपाध्यक्ष अमित म्हापणकर,कार्यकारिणी सदस्य बावतीस डिसोजा, विकास वैद्य,सचिन शेट्ये,माजी उपनगराध्यक्ष वामन कांबळे, महिला शहर अध्यक्षा सुप्रिया परब, राजू गवंडे, शिवाजी गावडे, बबन पडवळ,धर्माजी बागकर आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली महिला दशावतार पखवाजवादक कु.भाविका लक्ष्मण खानोलकर, टेनिस क्रिकेट महाराष्ट्र संघात निवड झालेली अपूर्वा सतिश परब,लिला सुभाष परब व १७ वर्षाखालील ओपन साईट रायफल चॅम्पियनशिप मध्ये महाराष्ट्रात प्रथम सानिया सुदेश आंगचेकर इत्यादींचा एम.के.गावडे व अन्य मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्तविक सत्यवान साटेलकर व नम्रता कुबल यांनी आभार मानले.

अभिप्राय द्या..