सावंतवाडी /-

मुंबई-गोवा महामार्गाच्या झाराप-पत्रादेवी बायपासवर मळगाव जोशी – मांजरेकरवाडी येथील सर्कलवर भरधाव कारची दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दांपत्य गंभीर रित्या जखमी झाले. शनिवारी रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला. पद्माकर गोपाळ नाईक ( ३०) व आदिती पद्माकर नाईक ( २५, दोघेही राहणार मळेवाड) अशी त्यांची नावे असून त्यांना उपचारार्थ तत्काळ सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पद्माकर नाईक यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारार्थ गोवा येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.

पद्माकर नाही हे आपल्या ताब्यातील दुचाकीने झाराप पत्रादेवी बायपासवरून मळेवाडच्या दिशेने निघाले होते. ते मळगाव जोशी मंजरेकरवाडी सर्कल लगत आले असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारची जोरदार धडक त्यांच्या दुचाकीला बसली. या अपघातात दुचाकी वरून फेकले गेल्यामुळे नाईक दांपत्य गंभीर रित्या जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रुग्णवाहिकेला पाचारण करून त्यांना तत्काळ उपचारार्थ सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातानंतर सावंतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी घटनेचा पंचनामा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page