You are currently viewing शेतकऱ्यांनी ३१ डिसेंबर पूर्वी भात खरेदी योजनासाठी भात क्षेत्राची नोंदणी करावी.;एम.के. गावडे

शेतकऱ्यांनी ३१ डिसेंबर पूर्वी भात खरेदी योजनासाठी भात क्षेत्राची नोंदणी करावी.;एम.के. गावडे

वेंगुर्ला /-


भात आधारभूत किंमत खरेदी योजना हंगाम २०२१ – २२ अंतर्गत ऑनलाईन शेतकरी नोंदणी करण्याबाबत ३१ डिसेंबर पर्यंत शासन स्तरावरून मुदतवाढ देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने संबंधित संस्थांनी शेतकरी नोंदणी सुरू करावी. नोंदणी करतेवेळी शेतकऱ्यांकडून चालू हंगाम २०२१-२२ खरीप हंगामातील भात ऑनलाईन नोंद असलेला मूळ सातबारा, आधारकार्ड, बँक पासबुक घेऊन शेतकऱ्यांची नोंदणी करावयाची आहे, असे जिल्ह्याचे मार्केटिंग अधिकारी यांनी कळविले आहे.त्यानुसार वेंगुर्ले तालुका खरेदी विक्री संघात ऑनलाइन शेतकरी नोंदणी ३१ डिसेंबर पर्यंत करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी ३१ डिसेंबर २०२१ पूर्वी भात खरेदी साठी भात क्षेत्राची नोंदणी करावी, असे आवाहन तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन एम. के. गावडे यांनी केले आहे. नोंदणी करतेवेळी चुकीचे मागील हंगामातील सातबारा रब्बी हंगामातील सातबारा हस्तलिखित सातबारा खाडाखोड केलेले झेरॉक्स सातबारा घेऊन मागणी करू नये.काही तांत्रिक अडचणी असल्यास एन.ई.एम. एल.चे सुयोग गिरकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..