You are currently viewing माजी आमदार प्रमोद जठार यांची वेंगुर्ले नगरपरिषदेस भेट व विकासकामांची पाहणी

माजी आमदार प्रमोद जठार यांची वेंगुर्ले नगरपरिषदेस भेट व विकासकामांची पाहणी

वेंगुर्ला /-


भाजपा प्रदेश चिटनीस माजी आमदार प्रमोद जठार यांनी वेंगुर्ले नगरपरिषदेस भेट दिली.तसेच नगरपरिषदेच्या विकास कामांची पाहणी केली व नगरपरिषदेच्या विकास कामांचे कौतुक केले.यावेळी
न.पा.सभागृहात नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा भेट देऊन त्यांचे स्वागत केले.माजी आमदार प्रमोद जठार यांनी वेंगुर्ले नगरपरिषदेचे प्रशासकीय कार्यालय,कलादालन, क्राॅफर्ड मार्केट, सागररत्न मस्त्य बाजारपेठ, बहुउद्देशीय संकुल, गार्डन यांची पाहणी केली.यावेळी त्यांनी विकास कामांचा दर्जा उत्कृष्ट ठेवल्या बद्दल वेंगुर्ले नगरपरिषदेचे कौतुक केले.यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी आपल्या पाच वर्षातील झालेल्या विकास कामांची माहिती दिली.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई,तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर, नगरसेवक प्रशांत आपटे, नगरसेविका साक्षी पेडणेकर, श्रेया मयेकर , जिल्हा चिटनीस रविंद्र शेटये, मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..