You are currently viewing प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला केंद्रास उत्कृष्ट काजू संशोधन केंद्र म्हणून देशात प्रथम क्रमांक.

प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला केंद्रास उत्कृष्ट काजू संशोधन केंद्र म्हणून देशात प्रथम क्रमांक.

वेंगुर्ला /-

 वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या काजू संशोधन केंद्राने उत्कृष्ट संशोधनात्मक, विस्तार कार्य आणि इतर तत्सम उत्कृष्ट असे काम केल्याने या काजू संशोधन केंद्रास उत्कृष्ट काजू संशोधन केंद्र म्हणून यावर्षीचा राष्ट्रीय पातळीवरील प्रथम  क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. 
राष्ट्रीय स्तरावरील अखिल भारतीय समन्वित काजू संशोधन प्रकल्पाची वार्षिक सभा दि ५ डिसेंबर व ६ डिसेंबर रोजी ऑनलाइन घेण्यात आली. सदर सभेमध्ये देशातील विविध काजू संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ आपल्या संशोधनाचे निष्कर्ष प्रस्तुत करतात. ज्या काजू संशोधन केंद्राने उत्कृष्ट संशोधनात्मक विस्तार कार्य आणि इतर तत्सम असे काम केलेले आहे अशा काजू संशोधन केंद्रास उत्कृष्ट काजू संशोधन केंद्र म्हणून गौरविण्यात येते. यावर्षीची अखिल भारतीय समन्वित काजू संशोधन प्रकल्पाची सभा नुकतीच पार पडली. सदर सभेमध्ये प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले अंतर्गत अखिल भारतीय समन्वित काजू संशोधन प्रकल्प वेंगुर्ला या प्रकल्पास देशातील उत्कृष्ट काजू संशोधन केंद्र म्हणून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असून त्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रादेशिक फळ संशोधन केंद्र अंतर्गत काजू संशोधन केंद्रास हा बहुमान तिसऱ्यांदा मिळालेला आहे. यापूर्वी हा बहुमान त्यांना सन २०१६, सन २०१७ आणि सन २०२१ मध्ये मिळालेला आहे. प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला अंतर्गत काजू संशोधन केंद्राने शेतकऱ्यांच्या दृष्टीने नेहमीच संशोधनात्मक भरीव कार्य अविरतपणे करत आहे. याचा एक भाग म्हणून नुकतेच वेंगुर्ले येथील काजूच्या सुधारित जाती व आफ्रिकन देशातील काजू यांचे ‘फायटोकेमिकल्स’ पृथथकरण करण्यात आले. या पृथथकरणातील घटकावरून या संशोधन केंद्रावरील काजू जातीची प्रतवारी तसेच गुणवत्ताही आफ्रिकन देशातील काजू पेक्षा उत्कृष्ट असल्याचे आढळून आले आहे. याचा फायदा सुद्धा काजू बागायतदारांना तसेच प्रक्रिया उद्योगांना होणार आहे. या संशोधन केंद्रावर नियमित काजू कलमांना जगभरात मोठी मागणी आहे. काजूगराच्या भाजीसाठी या संशोधन केंद्रावर तेलविरहीत व सहजपणे सोलता येणारी काजूच्या जातीवरील संशोधनसुद्धा सुरु आहे. त्याच प्रमाणे काजू उच्च घन लागवड तसेच इतर विविध संशोधनाचे काम सुरू आहे. अशा या जगप्रसिद्ध संशोधन केंद्रास देशभरातील सर्वोत्कृष्ट काजू संशोधन केंद्र म्हणून पुरस्कार प्राप्त झाल्याने विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.सदर पुरस्कार मिळण्याकरिता काजू संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. आर.सी. गजभिये यांनी अथक प्रयत्न केले.त्याचबरोबर त्यांना या केंद्राचे एल. एस. खापरे, कनिष्ठ काजू पैदासकार, डॉ. ए. वाय. मुंज, कनिष्ठ कीटकशास्त्रज्ञ एस. एन. पवार, वरिष्ठ संशोधन सहाययक एस. पी. साळवी, कनिष्ठ संशोधन सहाययक डी. जे. वाघ, कृषी सहाययक ए. डी. भांगे तसेच प्रक्षेत्रावरील सर्व कर्मचारी व मजूर यांचे सहकार्य व फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. बी. एन. सावंत, दापोली विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. पी. एम. हळदणकर यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा