You are currently viewing करूळ येथे संविधान संवाद कार्यशाळा संपन्न लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र यांचे आयोजन

करूळ येथे संविधान संवाद कार्यशाळा संपन्न लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र यांचे आयोजन

कणकवली /-

लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र (मुख्यालय राधानगरी) यांच्या वतीने संविधान संवाद शाळा जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा करूळ नं. 1 येथे संपन्न झाली.

संवाद शाळा सकाळी 11:00 वाजता घेण्यात आली. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका विनीता पाटील तसेच सहकारी शिक्षिका राणे मॅडम उपस्थित होत्या. या संवाद शाळेत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन संविधानातील मूल्यांच्या आधारे संविधान संवादक म्हणून छोट्या मित्र मैत्रिणींशी संवाद साधला. विद्यार्थ्यांकडून संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून घेतले. तसेच संविधान म्हणजे काय? संविधान का? कशासाठी? संविधान नसते तर? तसेच संविधानातील मूल्य, हक्क, कर्तव्य आणि संविधान प्रास्ताविकेतील मूल्य याविषयावर मांडणी केली. मुख्याध्यापिका पाटील यांनी ह्या उपक्रमाचे कौतुक करताना अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी प्रशालेचे सहकार्य असेल, असे सांगितले. यावेळी सुजय जाधव यांनी केंद्राच्या वतीने ‘संविधान ग्रेट भेट’ हे पुस्तक संविधानातील मूल्य शाळेतील मुलांवर रुजवावीत म्हणून शाळेला भेट दिले. २६ नोव्हेंबर ते २६ जानेवारीपर्यंत केंद्रातील संविधान संवादक प्रत्येक शाळा, कॉलेज मध्ये संवादशाळा घेणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

या कार्यशाळेसाठी संविधान संवादक सुनिल स्वामी, राजवैभव शोभा रामचंद्र, रेश्मा खाडे, हर्षल जाधव, कृष्णात स्वाती, तुषार चोपडे, प्रमोद गायधनी, शितल यशोधरा, शर्मिला जोशी, अमोल कदम, मिनाक्षी खतगावकर, रूपेश वानखेडे, निलेश साबळे आणि आम्ही संविधान संवादक टिमचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाले.

अभिप्राय द्या..