You are currently viewing मनोज उगवेकर मित्र मंडळ शिरोडा व अथायु हाॅस्पीटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित महाआरोग्य

मनोज उगवेकर मित्र मंडळ शिरोडा व अथायु हाॅस्पीटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित महाआरोग्य

वेंगुर्ला /-

मनोज उगवेकर मित्र मंडळ शिरोडा व अथायु हाॅस्पीटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विदयमाने अनंत प्रभू सभागृह शिरोडा येथे २६ नोव्हेंबर २०२१ रोजी महाआरोग्य शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरामध्ये १४५ रुग्णांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी अत्यावश्यक अशा ३१ रूग्णांना पुढील आवश्यक तपासणी, शस्त्रक्रियासाठी च्या पहिल्या बॅचच्या रुग्णाची सोमवार ६ डिसेबर २०२१ रोजी सकाळी ८ वाजता शिरोडा बस स्टॅण्ड येथून अथायु हाॅस्पीटल कोल्हापूर येथे जाण्यासाठी हाॅस्पीटलच्या बस मधून कोल्हापूर येथे जाण्यासाठी रवाना झाली.
यावेळी मनोज उगवेकर मित्र मंडळाचे रेडी जि.प.सदस्य प्रितेश राऊळ,जगन्नाथ राणे, नारायण उर्फ बाबल गावडे,लक्ष्मीकांत कर्पे,श्रीकृष्ण धानजी,सोमाकांत सावंत,चंद्रशेखर गोडकर,अनिल गावडे,शिरोडा सरपंच मनोज उगवेकर,आरवली ग्रामपंचायत सदस्य समीर कांबळी,शंकर गवंडी,कृष्णा कब्रे आदी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांकडून रूग्णांना पाण्याची बाटली देऊन पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

अभिप्राय द्या..