You are currently viewing १७ वर्षाखालील राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत सिधुदुर्ग जिल्हा चॅम्पियन –

१७ वर्षाखालील राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत सिधुदुर्ग जिल्हा चॅम्पियन –

वेंगुर्ला /-

  • महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सय्यद पिंपरी तालुका क्रीडा संकुल नाशिक येथे २ ते ५ डिसेंबर रोजी ४थी १७ वर्षाखालील राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा राज्य सचिव मीनाक्षी गिरी व राज्य तांत्रिक हेड स्वप्नील ठोमरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.राज्यातून तब्बल मुलांचे व मुलींचे ८ जिल्हा संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा टेनिस क्रिकेट अससोएशनचा संघ सहभागी झाला होता. कुणाल हळदणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्याने १८ संघांमधून फायनल मध्ये प्रवेश केला. अंतिम सामन्यात रोमांचक सामन्यात विजेता ठरला .आणि गोल्ड मेडल वर वर्चस्व गाजवले .या सामन्याचा सामनावीर दर्शन जोशी हा ठरला. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून चिन्मय कोळसुळकर याची निवड करण्यात आली. या चमकदार कामगिरीमुळे खेळाडूंनी निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सर्वात जास्त खेळाडू मुले व मुली यु पी येथील मथुरा येथे होणाऱ्या १७ वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. निवड झालेले खेळाडू राज्य सचिव मीनाक्षी गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली आता राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

अभिप्राय द्या..