You are currently viewing वेंगुर्ले भाजपाच्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन –

वेंगुर्ले भाजपाच्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन –

वेंगुर्ला /-

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनी वेंगुर्ले शहरातील आनंदवाडी येथील समाज मंदिरात डाॅ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप व भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तसेच मेणबत्ती प्रज्वलित करुन त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
यावेळी आदरांजली वाहताना नगराध्यक्ष दिलीप गिरप म्हणाले की,विषम समाज व्यवस्थेचे चटके सोसत तमाम वंचीतांना मायेची सावली देऊन, धरतीवरील क्रांतीसुर्य अस्तास गेला. परंतु जाण्यापूर्वी त्यांनी सकल मानव जातीला त्यांचे नैसर्गिक हक्क, न्याय, समान अधिकार बहाल केले.संपूर्ण जगात कुठल्याही देशात नसेल असे महान संविधान अर्पण करुन, बलाढ्य अशी लोकशाही बहाल केली ते म्हणजे विश्वरत्न, परमपुज्य, बोधीसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.अशा महामानवास त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम.यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस, किसान मोर्चा जि.सरचिटणीस बाळु प्रभु, माजी उपनगराध्यक्ष गिरगोल फर्नांडिस तसेच आनंदवाडी मधील समाज बांधव उपस्थित होते.

अभिप्राय द्या..