You are currently viewing महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशन च्या कोल्हापूर विभागीय सेक्रेटरी पदी निलेश चमणकर यांची निवड –

महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशन च्या कोल्हापूर विभागीय सेक्रेटरी पदी निलेश चमणकर यांची निवड –

वेंगुर्ला /-
महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशन च्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर विभागीय सेक्रेटरी म्हणून वेंगुर्ले येथील जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे पदाधिकारी निलेश जयप्रकाश चमणकर यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष विलास गावडे व सर्व पदाधिकाऱ्यांनी चमणकर यांचे अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशन ची निवडणूक मुंबई दहिसर येथे पार पडली. या निवडणुकीमध्ये असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून प्रतीक जयंत पाटील – सांगली यांची सर्वानुमते निवड झाली आहे. तर मुंबई उपनगर सेक्रेटरी म्हणून विरल शहा यांची निवड झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा