You are currently viewing भुईबावडा गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी आकोबा ऊर्फ बाबू मोरे यांची बिनविरोध निवड.

भुईबावडा गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी आकोबा ऊर्फ बाबू मोरे यांची बिनविरोध निवड.

वैभववाडी /-

भुईबावडा गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदी आकोबा ऊर्फ बाबू नारायण मोरे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. नवनियुक्त आकोबा मोरे भुईबावडा गावच्या देवस्थानचे पाटील आहेत. त्यांचे धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक कार्यात मोलाचा वाटा आहे. तसेच गाव एकसंघ ठेवण्यात देखील त्यांचा मोठा सहभाग आहे.

यावेळी सरपंच बाजीराव मोरे, उपसरपंच स्वप्नाली देसाई, माजी उपसभापती भालचंद्र साठे, ग्रा. पं. सदस्य श्रेया मोरे, वैशाली शिंदे, सानिका वारंगे, मोहिनी कांबळे, माजी उपसभापती रमेश मोरे, ग्रामसेवक श्री. बोडेकर, तानाजी मोरे, मनोहर मोरे, विलास मोरे, सदानंद मोरे, मंगेश मोरे, सुरेश मोरे, दिनेश मोरे, राजेंद्र मोरे, अमोल प्रभू, सदानंद देसाई, राजेश पाटणकर आदी उपस्थित होते. ही सभा कोरम पूर्ण होऊन एकमताने ही निवड प्रक्रिया पार पडली.

====

अभिप्राय द्या..