देवगड /-
सागरी सुरक्षेच्या अनुषंगाने कोकण विभागात रत्नागिरी, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, कोकण परिक्षेत्र ज्या भागात सागरी सुरक्षा अनुषंगाने सागर कवच अभियान राबविण्यात येत आहे.
सागर कवच अभियान करीता भारतीय नौदल, कोस्टगार्ड, पोलिस दल, कस्टम बंदर, बंदर विभाग एम. एम. बी., एम. एम. डी., सी. आय. एस. एफ., एम. आय. डी., आय. बी., फिशरीज विभाग तसेच इतर संबंधित संस्था सागर कवच अभियान दरम्यान सहयोग असणार आहे. या अभियानादरम्यान “रेड फोर्स” शत्रुपक्ष ब्लू फोर्स अशाप्रकारे कोड वापरून सागर कवच अभियान राबविण्यात येणार आहे. “रेड फोर्स” शत्रुपक्ष त्यांचा उद्देश विविध प्रकारची जहाजे, नौका यांचा वापर करून समुद्रकिनारी उतरणे तर ब्लुप्फस मित्रपक्ष यांचा उद्देश सदर पथकामध्ये भारतीय तटरक्षक दल, पोलिस, सीमा शुल्क विभाग, मस्त व्यवसाय व बंदर विभाग या विभागातील स्पीड बोटीचा वापर करण्यात येणार आहे. सागरी सुरक्षेच्या दृष्टीन सागरी किनारी, लँडिंग पॉईंट, जेटी, बंदर, मर्मस्थळे बंद या ठिकाणी सतर्क राहून संशयास्पद हालचाली, अनोळखी इसम, नौका आढळून आल्यास किंवा आक्षेपार्ह दिसल्यास त्याबाबतची माहिती पोलीस ठाणे अथवा नियंत्रण कक्ष 02352222222, 100 वा टोल फ्री नंबर 1093 वर कळविण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सागर कवच यशस्वी राबवण्यात यावे, याकरिता सर्व सागर रक्षक दल हद्दीत सतर्क राहून माहिती देतील. तर कवच अभियान मुख्यत्वे सागरी मार्ग होणारी घुसखोरी व आतंकवादी हल्ल्याच्या वेळी सागरी सुरक्षेशी संबंधित सर्व विभागांनी घ्यावयाची जबाबदारी याकरिता प्रभावीपणे गस्त होण्यासाठी उपाययोजना म्हणून सागर कवच अभियान राबविण्यात आले असून सर्व हद्दीतील सागर रक्षक सतर्क राहतील यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.