You are currently viewing तरंदळे गावचे ग्रामदैवत श्री टेवणादेवीचा वार्षिक जत्रोत्सव ४ डिसेंबर रोजी.

तरंदळे गावचे ग्रामदैवत श्री टेवणादेवीचा वार्षिक जत्रोत्सव ४ डिसेंबर रोजी.

कणकवली /-

तरंदळे गावचे ग्रामदैवत श्री टेवणादेवी चा वार्षिक जत्रोत्सव शनिवार दिनांक ४ डिसेंबर रोजी होणार आहे. टेवणा देवी देवस्थान जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. या जत्रेला माहेरवाशिणी मोठ्या संख्येने ओट्या भरण्यासाठी येतात. यात्रेच्या निमित्ताने रात्री सुधीर कलिंगण यांचे दशावतार नाटक आयोजित केले आहे. त्यानंतर पहाटे ४ वाजता देवीच्या ताटाची मिरवणूक व ओट्या भरण्याचा कार्यक्रम चालू होईल. तरी या जत्रोत्सवाला सर्वांनी covid-19 व अन्य घातक विषाणू रोगापासून सावधानता बाळगून उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थान समितीचे अध्यक्ष जयसिंग भाई नाईक यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..