You are currently viewing कणकवली कॉलेजमध्ये जागतिक एड्स दिन साजरा,एड्स विषयी करण्यात आली जनजागृती

कणकवली कॉलेजमध्ये जागतिक एड्स दिन साजरा,एड्स विषयी करण्यात आली जनजागृती

कणकवली /-

१ डिसेंबर हा दिवस जगभरामध्ये जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. एड्स चा होणारा प्रसार थांबवावा व एड्स बाधित लोकांना समाजामध्ये चांगली वागणूक मिळावी, या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात येतो. कणकवली कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना, सूक्ष्म जीवशास्त्र विभाग आणि रेड रिबीन क्लब उपजिल्हा रुग्णालय कणकवली यांनी संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमांतर्गत कणकवली कॉलेज व परिसरामध्ये एड्स बद्दल जनजागृती करण्यात आली. प्रत्येक व्यक्तीला रेड रिबीन लावून एड्स पासून सुरक्षित राहणे व बाधित लोकांची काळजी घेणे याबद्दल संदेश देण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी पंचवीस लोकांनी एच. आय. व्ही. निदान करून घेतले. कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करण्यासाठी प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले, प्रा. सुरेश पाटील, सुशील परब, कीर्ती पवार, प्रा. गीतांजली सापळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक मिहीर तांबे, समिधा पारकर, भाग्यश्री कुंभार, आकांक्षा कदम, शुभम देसाई, अवंतिका कांबळे, हर्षदा कुबल, संस्कृती चिंदरकर, प्रथमेश घाडी, निखिल पांगम व समीर तावडे, प्रमोद चव्हाण यांनी केले.

अभिप्राय द्या..