You are currently viewing सावंतवाडीत जखमी ‘भारद्वाज’ पक्षाला मिळाले जीवदान..

सावंतवाडीत जखमी ‘भारद्वाज’ पक्षाला मिळाले जीवदान..

सावंतवाडी /-

येथील विठ्ठल मंदीर परिसरात “भारद्वाज” हा पक्षी जखमी अवस्थेत आढळून आला होता. येथील प्राणीप्रेमी रवी जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करुन त्याला नैसगिक अधिवासात सोडले. यासाठी वनविभागाचे कर्मचारी प्रमोद राणे यांनी सर्वाना सहकार्य केले. हा पक्षी दिनेश सावंत यांना दिसला होता. त्या पक्षाला मदत करण्यासाठी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी त्यांना सहकार्य केले. तत्कालीन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या काळात त्या पक्षाला सिटी बर्डचा दर्जा देण्यात आला होता.

अभिप्राय द्या..