You are currently viewing अतुल काळसेकर पुन्हा जिल्हा बँक निवडणूकीच्या रिंगणात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केला अर्ज सादर.

अतुल काळसेकर पुन्हा जिल्हा बँक निवडणूकीच्या रिंगणात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केला अर्ज सादर.

कणकवली /-

सर्वप्रथम उमेदवारी अर्ज दाखल करत जिल्हा बँक निवडणुकीत भाजपा ने आघाडी घेतली असतानाच भाजपाने बँक निवडणुकीत अनुभवी चेहऱ्यांना संधी दिल्याचे पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीकरिता बँकेचे माजी संचालक, भाजपा चे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी पण मतदारसंघातून निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी वंदना खरमाळे यांच्याकडे श्री काळसेकर यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले. यावेळी त्यांच्या सोबत भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार बाळ माने, जयदेव कदम, अमित आवटे, संदीप नलावडे आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..