You are currently viewing वेंगुर्लेत रमण वायंगणकर,विकास वैद्य व जयप्रकाश चमणकर यांचा सत्कार.

वेंगुर्लेत रमण वायंगणकर,विकास वैद्य व जयप्रकाश चमणकर यांचा सत्कार.

वेंगुर्ला /-


भंडारी समाजामध्ये चांगली रत्ने घडून गेली आहेत.भंडारी समाजाने आपल्याला भरभरून प्रेम,पाठबळ दिले याला तोड नाही.आपण चार वेळा आमदार होण्याचे श्रेय भंडारी ज्ञाती बांधवांनाही जाते.रमण वायंगणकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले,त्याचा फायदा गोरगरीब, शिक्षणापासून वंचित असलेल्या,आर्थिक कोंडीत,दुर्बल घटक अशा लोकांना मदत करण्याचे काम जिल्हास्तरीय मंडळाने करावे,असे प्रतिपादन माजी आमदार शंकर कांबळी यांनी वेंगुर्ले येथे केले.यावेळी येथे जिल्हास्तरीय भंडारी समाज मेळावा पुन्हा आयोजित केल्यास आपले सर्वतोपरी सहकार्य राहील,अशी ग्वाही आमदार शंकर कांबळी यांनी दिली.भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्लाचे विद्यमान अध्यक्ष रमण शंकरराव वायंगणकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या अध्यक्षपदी, मंडळाचे विद्यमान सचिव विकास हरिश्‍चंद्र वैद्य यांची जिल्हा महासंघाच्या सचिवपदी व जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून जयप्रकाश नारायण चमणकर यांची नुकतीच निवड झाली.त्यानिमित्त भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्ला व समाज बांधवांकडून तिन्ही पदाधिकाऱ्यांचा वेंगुर्ले येथे भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार शंकर कांबळी हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी,रमण वायंगणकर,विकास वैद्य,जयप्रकाश चमणकर,भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाचे उपाध्यक्ष ऍड.शाम गोडकर,जिल्हा भंडारी महासंघाचे माजी सचिव राजू गवंडे,प्रा.आनंद बांदेकर, प्रा.सचिन परुळकर आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे उदघाटन माजी आमदार शंकर कांबळी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आले.यावेळी कोव्हिड काळात मृत्यमुखी पडलेल्या समाजबांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी मान्यवरांच्या हस्ते रमण वायंगणकर,विकास वैद्य व जयप्रकाश चमणकर यांचा शाल, श्रीफळ,सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.वेताळ प्रतिष्ठान तुळस च्या वतीने,सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी पतसंस्थाच्या वतीने तिन्ही जणांचा शाल व श्रीफळ देऊन,तसेच वायंगणकर कुटुंबियांच्या व बहुसंख्य भंडारी समाजबांधव यांच्या वतीने तिन्ही पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी वृंदा कांबळी,रमण वायंगणकर,विकास वैद्य,जयप्रकाश चमणकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भंडारी ऐक्यवर्धक मंडळाने जी कौतुकाची थाप दिली,त्याबाबत आभारी आहे.आपल्यावर जिल्ह्याची जबाबदारी आल्यामुळे वेंगुर्लेप्रमाणे जिल्हा महासंघाचे आदर्शवत काम करेन,असे रमण वायंगणकर म्हणाले.
यावेळी भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाचे पदाधिकारी,चंद्रकांत गडेकर, सत्यवान साटेलकर,जयराम वायंगणकर,रमेश नार्वेकर, दाजी धुरी,बाबली वायंगणकर,बबन नार्वेकर, राजेंद्र कांबळी, दिनेश तांडेल,नगरसेवक धर्मराज कांबळी, दादा सोकटे, नगरसेविका श्रेया मयेकर व साक्षी पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते सचिन वालावलकर,सुरेश बोवलेकर, प्राणीमित्र महेश राऊळ, नंदन वेंगुर्लेकर,माजी सभापती सारिका काळसेकर, ऍड.प्रकाश बोवलेकर, गोपाळ अणसुरकर,आळवे,कुडाळ नगरसेविका श्रेया गवंडे,सुरेश भोसले,सत्यवान पेडणेकर,आनंद नवार,किशोर सोनसुरकर आदींसह भंडारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक ऍड.शाम गोडकर व सूत्रसंचालन व आभार प्रा.सचिन परुळकर यांनी मानले.

अभिप्राय द्या..