You are currently viewing आमदार नितेश राणेंनी वाढदिनी सोनू सावंत यांच्या पाठीवर दिली कौतुकाची थाप १५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान..

आमदार नितेश राणेंनी वाढदिनी सोनू सावंत यांच्या पाठीवर दिली कौतुकाची थाप १५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान..

कणकवली /-

सोनू सावंत हा हाडाचा सामाजिक कार्यकर्ता असून वाढदिवसानिमित्त सातत्याने रक्तदान शिबिर आयोजित करून समाजहित साधण्याचे सोनू सावंत यांचे कसब नक्कीच कौतुकास्पद असल्याचे सांगत आमदार नितेश राणे यांनी भाजपा उपतालुकाध्यक्ष राजेश उर्फ सोनू सावंत यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. कणकवली भाजपा उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त सोनू सावंत मित्रमंडळाच्या वतीने वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, अशोक राणे, पं स सभापती मनोज रावराणे, पं स सदस्या राधिका सावंत, माजी पं. स.उपसभापती महेश गुरव, वरवडे सरपंच प्रभाकर बांदल, विजय कदम, हनुमंत बोन्द्रे, आजीम कुडाळकर, संतोष चव्हाण, दशरथ घाडीगांवकर, अमोल बोंद्रे, सादिक कुडाळकर, प्रदीप घाडीगांवकर, केतन घाडीगांवकर, रियाज खान, प्रमोद गावडे, मंगेश घाडीगांवकर, सिरील फर्नांडिस, प्रवीण गावडे, विजय कोदे,नितीन कदम, हसन खोत आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना आमदार नितेश राणे यांनी सोनू सावंत आणि त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीने प्रतिवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमांचेही कौतुक केले. केवळ स्वतःच्या गावातीलच नव्हे तर दशक्रोशीतील गरजूंच्या अडचणीला सोनू कायम धावून जातात.आपल्या मित्रमंडळाच्या युवाईच्या गळ्यातील ताईत बनून सोनू सावंत यांनी सर्वसामान्य जनतेसह आपल्या मित्रपरिवाराच्या हृदयात स्थान मिळवले आहे. त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत रात्री-बेरात्री मदतीला धावून जाण्याची वृत्ती सोनू सावंत यांचे भविष्य उज्ज्वल करणार असून आगामी काळात सोनू सावंत यांच्यावर अपेक्षित राजकीय जबाबदारी देण्याचे संकेत आमदार नितेश राणे यांनी दिले. सोनू सावंत मित्रमंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 151 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त रक्तदान केले. सोनू सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त वरवडे गावातील जि.प. प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्यासह खाऊवाटप करण्यात आले. सूत्रसंचालन सिनेकलाकार निलेश पवार यांनी केले तर आभार महेश गुरव यांनी मानले.

अभिप्राय द्या..