You are currently viewing भाजपा युवा नेते विशाल परब यांनी घेतली कर्नाटकच्या ग्रामविकास मंत्र्यांची भेट.;सिंधुदुर्ग च्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने प्रकल्पनिर्मिती बाबत केली चर्चा..

भाजपा युवा नेते विशाल परब यांनी घेतली कर्नाटकच्या ग्रामविकास मंत्र्यांची भेट.;सिंधुदुर्ग च्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने प्रकल्पनिर्मिती बाबत केली चर्चा..

सावंतवाडी /-

कर्नाटकचे ग्रामविकास मंत्री जे. एस. विश्वर आप्पाजी यांची भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी बेंगलौर येथे भेट घेतली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या औद्योगिक व विकासाच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. यावेळी भाजपा बेळगावचे आमदार संजय पाटील उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्हा व बेळगाव यांची एक प्रकारे नाळ जुळलेली आहे. कर्नाटक राज्यातील बेळगावहून मोठ्या प्रमाणात भाजी सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, वेंगुर्ला, मालवण, दोडामार्गसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होते. दिवसाला चार ते पाच ट्रक भाजी बेळगाव मधून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होत असते. जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बेळगांव च्या विविध भागातून भाजी व अन्य किराणामाल सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर येतो. श्री परब यांनी कर्नाटकचे ग्रामविकास मंत्री जे. एस. विश्वर आप्पाजी यांचे गुलाबपुष्प देत स्वागत केले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्याचे आमंत्रण विशाल परब यांनी मंत्र्यांना दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा