You are currently viewing ना.सतेज पाटील यांच्या विजयाचा आनंदोत्सव कणकवलीत राष्ट्रीय काँग्रेसकडून साजरा.

ना.सतेज पाटील यांच्या विजयाचा आनंदोत्सव कणकवलीत राष्ट्रीय काँग्रेसकडून साजरा.

कणकवली /-

विधान परिषद निवडणूकीत बिनविरोध नाम. सतेज (बंटी) पाटील विजयी झाल्याबद्दल कणकवली येथील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे काँग्रेसतर्फे फटाके फोडून आणि जिलेबी वाटप करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर, कणकवली तालुका उपाध्यक्ष निलेश नारायण मालंडकर, सुरज सुतार, मिलिंद सावंत, संदिप कदम, बुवा राणे, भगवान दळवी, तसेच रिक्षा चालक मालक पदाधिकारी आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. फटाके फोडून आणि जिलेबी वाटप करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

अभिप्राय द्या..