You are currently viewing कार्यकर्त्यांनो उठा, उठा ,,निवडणूक आली मते मिळवण्याची वेळ आली, आपला कोण परका कोण परक्याला आपलं म्हणण्याची वेळ झाली.

कार्यकर्त्यांनो उठा, उठा ,,निवडणूक आली मते मिळवण्याची वेळ आली, आपला कोण परका कोण परक्याला आपलं म्हणण्याची वेळ झाली.

दोडामार्ग /-

कसई दोडामार्ग नगरपंचायतचे आरक्षण काही दिवसांपूर्वी सोडत पद्धतीने जाहीर करण्यात आले असून आरक्षण वेगळ्या स्वरूपात पडलेले दिसून आल्याने जोरदार तयारीला सुरवात करणे आवश्यक आहे यापूर्वी खुला पुरुष जागेसाठी आरक्षित असलेले प्रभाग महिलांसाठी तर महिलांसाठी आरक्षीत असलेले प्रभाग पुरुषांसाठी आरक्षीत झाल्याने नवीन चेहरे नगरपंचायतच्या राजकारण येताना दिसणार आहेत असे एकंदरीत चित्र दिसत आहे.
काही इच्छुक असलेल्या उमेदवारांनी तर आरक्षण पडण्याच्या आगोदरच कामे करण्यास सुरुवात केलेली दिसत होती परंतु ही कामे व्यर्थ गेल्याचे चित्र देखील पडलेल्या आरक्षणातून दिसून येत आहे, इच्छुक असलेल्या उमेदवारांन पैकी काहींची तर अशी परिस्थिती आहे की स्त्री एखाद्या प्रभाग मध्ये इच्छुक असल्यास पुरुष आरक्षण आहे तर पुरुष इच्छुक असल्यास स्त्री आरक्षण असल्याने इच्छुक उमेदवारांन मध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे त्याच प्रमाणे महिलांमध्ये किती नवीन चेहरे समोर येत आहेत तर पुरुषांमध्ये किती नवीन चेहरे येत आहेत याकडे आता मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदात्यांचे लक्ष लागून आहे तर ही निवडणूक पक्षीय बळा पेक्षा त्या उमेदवाराचे वयक्तिक संबंध कसे आहेत यावर निश्चित राहणार आहे तर यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी देखील मिळणार असल्याचे दिसत आहे.

अभिप्राय द्या..