You are currently viewing भाजपाचे माजी शहरअध्यक्ष योगेश महाले यांच्यासह विजय मोहिते, उल्हास रेडकर यांचा खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश.

भाजपाचे माजी शहरअध्यक्ष योगेश महाले यांच्यासह विजय मोहिते, उल्हास रेडकर यांचा खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश.

दोडामार्ग /-

कसई – दोडामार्गची नगरपंचायत निवडणूक जाहीर झाली असून आता अनेक पक्षात इनकमिंग आउट गोईगचा खेळ रंगताना दिसत आहे. यात भाजपा माजी शहरप्रमुख तथा शक्ती केंद्र प्रमुख योगेश महाले यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला असून खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, दोडामार्ग तालुकप्रमुख बाबुराव धुरी, माजी उपसभापती आनंद रेडकर यांच्या उपस्थितीत “शिवबंधन” हातात बांधले. त्यांच्याबरोबर उद्योजक विजय मोहिते व सावंतवाडा येथील सामाजिक कार्यकर्ते उल्हास रेडकर हेही सेनावासी झालेत आहेत. आपल्या भाजपा शहराध्यक्ष पदाच्या काळात विशेष प्रकाशझोतात आलेले योगेश महाले यांचा सेना प्रवेश भाजपा साठी डोकेदुखी ठरू शकतो, त्यांची नगरपंचायत क्षेत्रात विशेष ओळख असून युवा नेतृत्व म्हणून ते परिचित आहेत, आपल्या आगामी वाटचाली विषयी आपण लवकरच दिशा स्पष्ट करू असे सांगताना राज्यात सत्ता असलेल्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातुन नगरपंचायत क्षेत्रात विकासकामे मार्गी लागतील यासाठी तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे ते म्हणाले. विजय मोहिते व उल्हास रेडकर यांचेही विशेष कार्य या नगरपंचायत क्षेत्रात असून त्यांच्या प्रवेशाने सेना अजून भक्कम झाली आहे.

अभिप्राय द्या..