You are currently viewing विद्यार्थ्यांनी एकाग्रचित्ताने ज्ञान आत्मसात करून यश संपादन करावे.;रोटरी क्लब ऑफ चेंबूर अध्यक्ष नारायणप्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन.

विद्यार्थ्यांनी एकाग्रचित्ताने ज्ञान आत्मसात करून यश संपादन करावे.;रोटरी क्लब ऑफ चेंबूर अध्यक्ष नारायणप्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन.

मालवण /-

चांगले आणि सखोल ज्ञान हा प्रगतीचा मार्ग असून शिक्षणातूनच सर्वांगीण विकास घडत असल्याने विद्यार्थ्यांनी मन लावून एकाग्रचित्ताने ज्ञान आत्मसात करून यश संपादन करावे असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ चेंबूर मुंबईचे अध्यक्ष रो. नारायणप्रसाद कुलकर्णी यांनी येथे बोलताना केले वडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल मधील १७ विध्यार्थीनीना रोटरी क्लब ऑफ चेंबूरने सायकलींचे वाटप केले त्यावेळी रो. कुलकर्णी हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ चेंबूरचे माजी अध्यक्ष सुरेश भोसले, सौ. सुधा भोसले, राष्ट्रीय फर्टिलायझर आणि केमिकल प्रा. लिमिटेड मुंबईच्या डेप्युटी जनरल मॅनेजर सौ. नंदा कुलकर्णी, संस्थेचे सहखजिनदार अभिमन्यू कवठणकर, प्रचिती कुलकर्णी, शांतादुर्गा हायस्कूलचे मुख्याध्यापक जे. एन.पाटील, चाफेखोल प्राथमिक शाळेच्या शिक्षिका हळदणकर, श्री. कुबल, श्री. भाऊ भोगले आदी व इतर उपस्थित होते. प्रारंभी जे एन पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना सुरेश भोसले म्हणाले, मुलींचे सक्षमीकरण करण्याची थीम घेऊन आज रोटरी क्लब ऑफ चेंबूर ही सामाजिक संस्था काम करीत आहे. रोटरी क्लबच्या या उपक्रमाचा एक भाग म्हणून मुलींना आज सायकल वाटपाचा कार्यक्रम याठिकाणी पार पडत आहे. या शाळेत शिक्षण घेणारी मुले जी दुर्गम भागातून येतात आज एसटीचा संप सुरू असल्याने मुलांसमोर शाळेत येण्याचा फार मोठा प्रश्न उभा आहे. आणि या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी रोटरी क्लबने सायकल वाटप कार्यक्रम हाती घेतल्याचे सांगितले तर रो सुरेश भोसले यांनी या शाळेने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी राबविलेल्या उपक्रमाबद्दल कौतुक करून या शाळेत आय बी टी व्दारे सुरू असलेल्या तांत्रिक शिक्षणामुळे भावी काळात नवउद्योजक निर्माण होतील असे ते म्हणाले. यावेळी नंदा कुलकर्णी, अभिमन्यू कवठणकर, यांचीही समयोचित भाषणे झाली यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला शेवटी सौ यांनी आभार मानले.

अभिप्राय द्या..