वेंगुर्ला /-

वेंगुर्ले तालुक्यातील मनोज उगवेकर मित्रमंडळ शिरोडा व अथायु हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने २६ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत अनंत प्रभू सभागृह ,अ. वि. बावडेकर हायस्कूल शिरोडा येथे 
मोफत हृदयविकार व दुर्बीणद्वारे मुतखडा व प्रोस्टेट ऑपरेशन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी डॉ. सिधनगौडा मालिबिरादर ,डॉ. राहुल पाटील मुत्र विकार तज्ञ आदी डोकटर उपस्थित राहणार आहेत. यावेळी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना,(पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना) अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया, मुतखडा, प्रोस्टेट इत्यादी शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत.तसेच ई.सी.जी, रक्तातील साखर तपासणी मोफत केली जाणार आहे. कॅम्प मधील सहभागी पेशंट ना ६५०० रुपये ची अँजिओग्राफी मोफत केली जाईल. मुतखडा ऑपरेशन साठी पेशंट कडे  १ महिन्याच्या आतील सोनोग्राफी रिपोर्ट असणे आवश्यक आहे.शिबीर मध्ये ज्या पेशंटना ऑपरेशन सांगितले आहे अशा पेशंटना हॉस्पिटल कडून मोफत बस  सुविधा करण्यात येणार आहे. शिबीर मध्ये येताना सर्व जुने रिपोर्ट्स घेऊन येणे.शिबिराला येताना आपले ओरिजनल आधार कार्ड व रेशन कार्ड घेऊन येणे आवश्यक आहे.नाव नोदणी साठी गुरुनाथ धानजी,ओंकार कोनाडकर,
समिर कांबळी यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन मनोज उगवेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page