वेंगुर्ला /-

कोरोना लॉकडाऊन उठल्या पासून सुट्टी च्या दिवसात सिंधुदुर्गातील सर्व पर्यटन सागरी किनारे गजबजून गेले आहेत. दिवसेंदिवस पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे.
शिरोडा येथे ही सागरी पर्यटना चा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढत आहे. काही पर्यटक मौज मजा करताना स्थानिक प्रशासनाच्या नियमांकडे व निर्बंधांकडे दुर्लक्ष करून समुद्रातील खोल पाण्यात आंघोळीसाठी जात असतात. अशा वेळी कित्येक पर्यटकांचा अपघात होत आहे. त्यांना स्थानिक रहिवासी जीव संकटात घालून वाचवीत असल्याच्या घटना घडत आहेत.
१९ नोव्हेंबर रोजी गणेश बेलगणी – निपाणी व सागर वाली- गडहिंगलज येथील रहिवासी असलेले दोघे समुद्रात आंघोळीसाठी पाण्यात उतरले असताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने बुडत असताना शिरोडा ग्रामपंचायत ने काही दिवसा पूर्वीच नेमलेल्या सुरक्षा जीव रक्षक संजय नार्वेकर यांनी प्रसंगावधान राखून स्थानिक रहिवासी च्या मदतीने त्यांना सुखरूप पाण्याबाहेर आणले व दोघा ही पर्यटकांचे जीव वाचवले. त्यामुळे नार्वेकर यांच्या कर्तव्यदक्षतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वीच शिरोडा ग्रामपंचायत सरपंच मनोज उगवेकर व ग्रामविकास अधिकारी सुनील चव्हाण यांनी वेंगुर्ला पं. स.गटविकास अधिकारी उमा पाटील यांची भेट घेऊन शिरोडा सारख्या पर्यटकांची गर्दी असलेल्या समुद्र किनाऱ्यावर सागरी सुरक्षे च्या माध्यमातून जेट स्की व इतर उपकरणे तसेच जादा जीवरक्षक नेमण्या साठी वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न झाले पाहिजेत या विषयी चर्चा केलेली आहे.
समुद्र किनाऱ्यावर फिरताना व पर्यटनाचा आनंद घेत असताना येणाऱ्या पर्यटकांनी स्थानिक प्रशासनाचे नियम पाळावे , स्वतःची व आपल्या सोबत असलेल्या इतरांची योग्य ती खबरदारी घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन शिरोडा ग्रामपंचायत तर्फे सरपंच मनोज उगवेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page