You are currently viewing कणकवली पंचायत समिती नुतन इमारतीचा कार्यक्रम पुढे ढकलला..

कणकवली पंचायत समिती नुतन इमारतीचा कार्यक्रम पुढे ढकलला..

कणकवली /-

केंद्रीय मंत्रीमंडळाची अत्यंत महत्त्वाची बैठक नवी दिल्ली येथे तातडीने आयोजित करण्यात आल्याने कणकवली पंचायत समिती नुतन इमारतीचा १७ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजता उद्घाटन समारंभ रद्द करण्यात आल्याचे आमदार नितेश राणे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्र कात म्हटले आहे. तसेच पुढील तारीख निश्चित झाल्यावर सर्वांना कळविण्यात येईल असेही प्रसिद्धी पत्रकात त्यांनी सांगितले आहे कणकवली पंचायत समितीचा नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम उद्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते आयोजित केला होता पण अचानक तातडीची बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आल्याने उद्या होणारे सर्व कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याने लवकरात लवकर पुढची तारीख आपण निश्चित करून सर्वांना कळवण्यात येणार असल्याचे आमदार नितेश राणे प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

अभिप्राय द्या..