You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनची सभा खेळीमेळीत संपन्न.;नारायण राणेंच्या संयमाची भूमिकेमुळे खडाजंगी टळली..

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनची सभा खेळीमेळीत संपन्न.;नारायण राणेंच्या संयमाची भूमिकेमुळे खडाजंगी टळली..

सिंधुदुर्गनगरी /-आज १६ नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनची सभा पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली अगदी खेळीमेळीत पार पडली.केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या संयमाच्या भूमिकेमुळे खडाजंगी झाली नाही.अनेक आपल्याच भाजपच्या सदस्यांना थाम्बवत जिल्हा नियोजन ची सभा खेळी मेळीत घेतली.अनेकांचे अंदाज फोल ठरवत आज येथे आयोजित करण्यात आलेली जिल्हा नियोजनची सभा खेळीमेळीत पार पडली.

सभेच्या अध्यक्ष स्थानी असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी यशस्वीरीत्या प्रश्न हाताळले.आमदार नितेश राणेंसह काही भाजपाच्या सदस्यांनी हंगामा करण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी सयंमाची भूमिका घेत विषय पत्रिकेच्या बाहेरचे विषय नको, असे सांगून आपल्याच सदस्यांना शांत बसा, अशी सुचना केली. त्यामुळे काही तुरळक विषय वगळता बर्‍याचश्या विषयावर सकारात्मक चर्चा झाली.मात्र खुद्द राणेंनीच आमदार दीपक केसरकरांना चिमटे काढले.आणि राणे आणि केसरकर यांच्यात थोडी शाब्दिक चकमक झाली पण सभा सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून खेळी मेळीत घेण्यात आली.

अभिप्राय द्या..